तुम्हाला विश्वास नाही बसणार नाही याठिकाणची कुटुंब त्यांच्या मृत आई-वडिलांना अनेक वर्षांसाठी त्यांच्याबरोबर ठेवतात. सामान्य पद्धतीने त्यांच्याबरोबर राहतात. इंडोनेशियातील सुलावेसी याठिकाणी तोरजा नावाची एक जागा आहे. याठिकाणच्या आदिवासी लोकांची ही परंपरा आहे.
घरामध्ये शवपेटी उघडी ठेवून त्यामध्ये हे शव ठेवण्यात येते. या शवपेटीच्या आजुबाजुला उभं राहून घरातील माणसं मृतदेहाबरोबर गप्पा मारतात
मृत व्यक्ती आजारी आहे असंच मानून त्यांचा मृतदेह घरात ठेवण्यात येतो. घरी येणाऱ्या पाहुण्यांशी त्यांचा परिचय करण्यात येतो.
याठिकाणी अनेक घरांमध्ये 15 ते 20 वर्ष जुने मृतदेह आहेत. काही तर अगदी किड्यांनी खाल्ल्याप्रमाणे छिन्नविछिन्न झाले आहेत. या मृतदेहांना अनेक कपड्यांनी झाकण्यात येतं.
लहान मुलं घरात असून सुद्धा ही परंपरा गेली अनेक वर्ष सुरू आहे. त्यांना देखील हेच सांगण्यात येतं की मृत व्यक्ती आजारी असल्यामुळे ती झोपली आहे.
मृत व्यक्ती परिवारातील महत्त्वाचा हिस्सा मानण्यात येतो. त्यामुळे त्यांचा मृतदेह तसाच घरात ठेवण्यात येतो. या लोकांमधील एखाद्या प्रमुखाचा मृत्यू झाला तर जास्त वर्षांसाठी मृतदेह सांभाळण्यात येतो.
अनेक वर्षांनी या मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यात येतात. तोपर्यंत त्यांच्या पुढे जेवण-पाणी ठेवण्यात येते. काहींना दर दोन दिवसांनी सिगारेट सुद्धा देण्यात येते.
या समाजाची धारणा आहे की, त्यांनी जर मृतदेहाची देखभाल नाही केली तर त्यांना पुढे त्रास सहन करावा लागेल. जेव्हा त्यांना वाटतं की आता आत्माची मोक्षप्राप्तीची वेळ आली आहे तेव्हा ते त्यांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करतात.