जगातील विचित्र प्रतिबंधसामान्यपणे एखाद्या गोष्टीमुळे धोका असतो तेव्हाच त्या गोष्टीवर प्रतिबंध असतो. पण जगात असे काही देश आहेत, जिथं नको त्या गोष्टींवरही प्रतिबंध आहेत. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
इटलीतील कॅपरी आयलँडवर फ्लिप फ्लॉप आणि इतर आवाज करणाऱ्या फुटवेअरवर बॅन आहे. इथं लोक सँडलच घालतात. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
फ्रान्समध्ये शाळेत मीठ, साखर, केचअप, मायो, लोणचं असे चव देणारे आणि चविष्ट पदार्थ अति खाण्यास मनाई आहे. कँटिनमध्ये मर्यादित प्रमाणात हे पदार्थ मिळतात. जेणेकरून मुलं लठ्ठ होऊ नयेत. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
ऑस्ट्रेलियात मीम शेअर करण्यावर बॅन आहे. मीम्समध्ये वापरल्या जाणाऱ्या फोटोवर कॉपीराइट असतो, त्यामुळे हा नियम आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
चीनमध्ये टाइम ट्रॅव्हलवर बॅन आहे. म्हणजे हा नियम फिल्मसाठी लागू आहे. सरकारच्या मते, अशा फिल्ममुळे इतिहासाशी छेडछाड केल्याचं दाखवलं जातं. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
जर्मनीत हायवेवर गाडीतील गॅस संपण्यावर बॅन आहे. ऑटोबॅहन्सवर हा नियम लागू आहे. कारण हा हायस्पीड हायवे आहे, जिथं गाड्या थांबत नाहीत. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
ग्रीसमध्ये महिलांना ऐतिहासिक ठिकाणांसह काही विशिष्ट ठिकाणांवर हाय हिल्स घालण्यास परवानगी नाही. हाय हिल्समुळे एकाच जागेवर जास्त दाब पडतो, त्यामुळे ऐतिहासिक इमारतींचं स्ट्र्क्चर खराब होऊ शकतं, इसं इथलं सरकार मानतं. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
अमेरिकेत अस्वलासारखं दिसणारं फर्बीज नावाचं खेळणं 90 च्या दशकात खूप विकलं जायचं. या खेळण्याच्या मदतीने मुलं बोलायला शिकायचे. पण शत्रू या खेळण्याच्या माध्यमातून गुप्त माहिती रेकॉर्ड करू शकतात म्हणून नॅशनल सिक्युरिटी एजन्सीवर यावर बॅन लावला.(फोटो सौजन्य-@astroengine/Twitter)
नायजेरियात दुसऱ्या देशातील नागरिकांना हातगाड्यांना परवानगी नाही. स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी हा नियम आहे.(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
जपानमध्ये तर लठ्ठ असण्यावरच बॅन आहे. 40 ते 74 वयोगटातील लोकांना नोकरी देताना त्यांच्या कमरेचा घेर तपासला जातो. जर ती व्यक्ती लठ्ठ असेल तर तिला इन्स्ट्रक्टर दिला जातो. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)
तिबेटमध्ये भिक्खूंचा पुनर्जन्माला मान्यता आहे. पण परवानाशिवाय पुनर्जन्म घेण्यास परवानगी नाही. मॉन्कला पुनर्जन्म घेण्यासाठी चिनी सरकारची लायसन्ससह परवानगी घ्यावी लागते.(प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)