प्रत्येक पालक आपल्या मुलांचं नाव काहीतरी अनोखं, वेगळं, युनिक आणि हटके ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका मुलीचं नाव तिच्या शिक्षिकेसाठी डोकेदुखी ठरली आहे.
या विद्यार्थिनीचं नाव इतकं अवघड आहे की शिक्षिकेलाही ते वाचता येत नाही आहे. शिक्षिकेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत पोस्ट करून आपल्या या समस्येबाबत सांगितलं.
फेसबुकवरील पोस्टमध्ये शिक्षिका म्हणाली, मला हायस्कूलच्या एका वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी घ्यायची होती. एका विद्यार्थिनीचं नाव वाचण्यात मला खूपच संघर्ष करावा लागला.
या मुलीचं नाव आहे, Romanadvoratrelundar. आता तुम्हाला हे नाव वाचता आलं असेल, तर त्याचा उच्चार आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
अखेर या विद्यार्थिनीने आपल्याला फक्त रोमी नावाने हाक मारण्यास सांगितलं, असंही या शिक्षिकेने सांगितलं आहे.