साप हा जगातील सर्वात विषारी जीव असल्याचं मानलं जातं. मात्र त्याच्यापेक्षाही अधिक विषारी जीव जगात अस्तित्त्वात आहे. पृथ्वीवरील सर्वात विषारी प्राणी पाण्याखाली राहतो. हा विषारी प्राणी एक गोगलगाय असून याचं नाव जिओग्राफी कोन आहे. जिओग्राफी कोन मुख्यतः इंडो-पॅसिफिक समुद्राच्या आतील खडकांवर राहतात. ही गोगलगाय आपल्या बचावासाठी घातक विष सोडते. या विषाच्या 10 वा भागही एखाद्या व्यक्तीचा सहज जीव घेऊय शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे या विषावर अद्याप कोणतंही औषध बनलं नाहीये.