कसवाचे विविध प्रकार, जाती कायमच चर्चेत असतात. सध्या एका कासवाचे वय आणि त्याला असलेल्या बाळांची चर्चा रंगली आहे.
इक्वेडोरमध्ये राहणारे डिएगो कासव खूप प्रसिद्ध आहे. या कासवाचा उपयोग चेलोनोइडिस हडेन्सिस प्रजातीच्या कासवांना वाचवण्यासाठी करण्यात येत आहे.
गॅलापागोस प्रजातीतील कासवे कमी होत चालल्यामुळे ही प्रजाती वाचवण्यासाठी एक कार्यक्रम राबण्यात आला होता.
या कार्यक्रमात गॅलापागोस प्रजातीची कासवे जन्म देण्याची गरज होती. त्यामुळे 1960 मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅन दिएगो प्राणीसंग्रहालयातून डिएगो आणण्यात आले होते.
चेलोनोइडिस हडेन्सिस प्रजातीची मुले निर्माण करण्याच्या कार्यक्रमात डिएगोचा मोठा हात होता. एकट्याने 800 मुले निर्माण करण्यात यश मिळवले.
गेल्या अनेक दशकांपासून फॉस्टो लॅरेना सेंटरमध्ये चेलोनोइडिस हुडेन्सिव्हच्या मुलाचे पुनरुत्पादन सुरु होते. डिएगो 2020 मध्ये निवृत्त झाला आहे.