जगभरात अशी अनेक गावं आहेत जी आपल्या अनोख्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. असंही एक गाव आहे जिथे सर्वच कोट्यवधी आहे. विशेष गोष्ट म्हणजे इथे बाहेरुन राहायला येणाऱ्या लोकांना बंगला आणि गाडी मोफत मिळते. गाव सोडून जाताना त्यांना कार आणि बंगला परत करावा लागतो. हे गाव चीनच्या जीआंगसू मध्ये आहे. या गावाला लोक 'सुपर व्हिलेज' म्हणतात. 1960 मध्ये हे गाव रेनबाओच्या नात्याने स्थापन केले होते. दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील लोक मुख्यतः फळांची शेती करतात. येथील लोकांचं वार्षिक उत्पन्न सुमारे 80 लाखांच्या आसपास आहे. या गावातील लोकांकडे आलिशान बंगले, वाहने, हेल्कॉप्टर देखील आहे.