श्रीलंकेत जिवंत प्राण्यांच्या निर्यातीवर बंदी आहे. पण तरी श्रीलंका चीनला माकडं पाठवणार आहे. तब्बल एक लाख माकडं श्रीलंकेहून चीनला पाठली जाणार आहेत.
श्रीलंकेचे कृषिमंत्री महिंदा अमरावीरा यांनी सांगितलं की, चिनी कंपनीच्या निवेदनानुसार एक लाख माकडांना एक हजार प्राणीसंग्रहायलात दिलं जाईल. यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे. जी माकडांच्या विक्रीबाबतच्या प्रस्तावाबाबत तपासणी करेल. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Pixabay)
श्रीलंकन सरकारच्या या निर्णयाला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. प्राणी संरक्षण करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. माकड नामशेष होण्याची, त्यांचा गैरवापर केला जाण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Pixabay)
टॉक मकेक माकडं श्रीलंकेतील मूळ प्राणी आहेत. त्यांना इंटरनॅशनल युनियन फॉर कन्वर्शेसन ऑफ नेचरच्या लाल सूचीत नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींमध्ये टाकण्यात आलं आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Pixabay)
श्रीलंकेच्या कृषी मंत्रालयाचे अधिकारी गुनादासा समरासिंघे यांनी सांगितलं की, सरकार एकाच वेळी एक लाख माकडं पाठवणार नाही. शिवाय अशाच परिसरातून ही माकडं उचलली जातील जिथं या माकडांनी शेती उद्ध्वस्त केली आहे. संरक्षित भागातील माकडांना उचलणार नाही. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Wikimedia Commons)
श्रीलंकेने चीनची ही मागणी मान्य करण्याचं कारण श्रीलंकेवरील आर्थिक संकट सांगितलं जातं आहे. या माकडांनी श्रीलंकेतील बऱ्याच भागांमध्ये शेती उद्ध्वस्त केली आहे. माणसांवरही या माकडांनी हल्ला केला आहे. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Wikimedia Commons)