मुलाच्या खोलीत त्यांनी प्रत्येक सुविधा दिल्या आहेत. या खोलीमध्ये 24 तास लाईट आणि पंखा चालतो. मुलाला आराम करण्यासाठी बेडही तयार करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यासाठी पाणीही भरुन ठेवण्यात आले आहे.
यासोबत मुलाचे फोटो आणि त्यांना वीरमरण आल्यावर देण्यात आलेला सामान, वर्दी, तिरंगा यासोबतच त्यांच्या मुलावर छातीत शत्रूंनी झाडलेली गोळ्यासुद्धा त्यांच्या आईजवळ आहेत. 24 वर्षांनंतरही बलविंदर सिंह हे त्यांच्या आईसाठी जिवंत आहेत. त्यांच्या आईचे असे मत आहे की, त्यांचा मुलगा घरी येतो आणि आजही देशाची रक्षा करतो.
बलविंदर सिंह यांच्या आईच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 19 व्या वर्षी कारगिल युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात बलविंदर सिंग हे शहीद झाले होते. 5 जानेवारीला जेव्हा भारतात शत्रू घुसखोरी करत होते, त्यावेळी बलविंदर सिंग यांना एका बोगद्यावर दोन शत्रू दहशतवादी दिसले.
यादरम्यान बलविंदर सिंग यांनी त्या दोघांना आव्हान दिले आणि त्यांच्याशी लढू लागले. मात्र, यादरम्यान शत्रूने बलविंदर सिंग यांच्या छातीत गोळ्या झाडल्या आणि बलविंदर सिंग शहीद झाले. बलविंदर सिंग यांच्या बलिदानानंतर भारतीय लष्कराला त्याठिकाणी एक बोगदा सापडला. या बोगद्याद्वारे शत्रू भारतात घुसखोरी करत होता असे समजले. हा बोगदा भारतीय सैन्याने नष्ट केला आणि शत्रूची शस्त्रे, तसेच वस्तूंचा साठा जप्त केला.
शहीद बलविंदर सिंग यांच्या आई बच्चन कौर याबाबत भावूक होत सांगतात की, त्यांचा मुलगा बलविंदर सिंग हा भारतीय सैन्याच्या शीख रेजिमेंटमध्ये शिपाई या पदावर होता. जर बलविंदर सिंग यांचा दारूगोळा संपला नसता तर बलविंदर सिंग शहीद झाला नसते. बलविंदर सिंग यांनी शत्रूशी तब्बल 5 तास लढा दिला. त्यामुळे भारतीय लष्कराच्या अनेक जवानांचे प्राण वाचले.
बलविंदर सिंग शत्रूशी लढले नसते तर भारतीय लष्कराला शत्रूच्या शस्त्रास्त्रांची माहिती मिळाली नसती. यामुळे अनेक जवांनाचे प्राण जाऊ शकले असते, असेही त्या म्हणाल्या. बच्चन कौर यांनी सांगितले की, मुलाला कोणतीही समस्या येऊ नये, म्हणून त्याच्या हिस्सा म्हणून त्याच्यासाठी एक खोली बनवण्यात आली असून त्यात त्याचे सामान ठेवण्यात आले आहे. या खोलीला ते मंदिरासारखे पूजतात. मुलासाठी त्यांनी झोपायला बेड लावला आहे. तसेच याठिकाणी पाणी ठेवण्यात आले आहे, पंखा आणि लाईटही 24 तास याठिकाणी चालतात.
बलविंदर सिंह यांचे भाऊ आणि वहिनी बलविंदर यांची सेवा करतात. त्या म्हणाल्या, सरकार आणि प्रशासनाने त्यांना जे काही दिले, त्यामुळे त्या संतुष्ट आहेत.
बलविंदर यांचे भाऊ बूटा सिंह आणि वहिनी जसविंदर कौर सांगतात की, सकाळी उठल्यानंतर बलविंदर सिंह यांच्या रुममध्ये जाऊन ते माथा टेकतात आणि यानंतर सर्व कामे केली जातात. त्यांनी सांगितले की, बलविंदर सिंह यांना वीरमरण आल्यानंतर अनेक तरुणांनी यातून प्रेरणा घेऊन ते भारतीय सैन्यदलात दाखल झाले.
त्यांच्या परिवारातील दोन तरुण हे भारतीय सैन्यदलात आहेत आणि त्यांच्या शेजारी राहणारे तरुणही सैन्यदलात दाखल झाले आहेत. युवकांनी अंमली पदार्थांचे व्यसन सोडून देशाच्या रक्षणासाठी आपले योगदान द्यावे, असे ते म्हणाले. शहीद बलविंदर सिंह यांच्याबाबत जो निर्णय त्यांच्या आईने घेतला ते त्याचे स्वागत करतात, असेही ते म्हणाले.