Home » photogallery » viral » SCRAP DEALERS IDEO PURCHASED 6 NO USE HELICOPTERS FROM INDIAN ARMY NOW FUTHURE IS SET MHMG
भंगार विक्रेत्याची भन्नाट आयडिया, भारतीय सैन्याकडून 6 कंडम हेलिकॉप्टरची खरेदी; आता भविष्य सेट...
सध्या शहरात या भंगार विक्रेत्याची मोठी चर्चा सुरू आहे.
|
1/ 5
पंजाबमधून एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. येथील भंगाराचं सामान विकणाऱ्या एका व्यक्तीनी भारतीय सैन्याचे 6 कंडम हेलिकॉप्टर खरेदी केली आहे. जे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. या एका हेलिकॉप्टरचं वजन 10 टन इतकं आहे. लिलावाच्या माध्यमातून भंडार विक्रेत्याने हे हेलिकॉप्टर खरेदी केले आहेत.
2/ 5
एक हेलिकॉप्टर मुंबईतील व्यक्तीने घेतलं आहे, तर लुधियानातील हॉटेल मालकाने दोन हेलिकॉप्टर खरेदी केली आहे. उरलेले हेलिकॉप्टर मानसा येथे उभे आहेत. सध्या हे हेलिकॉप्टर लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. पंजाबमध्ये भंगाराचं सामनासाठी मिट्ठू भय्याचं नाव प्रसिद्ध आहे.
3/ 5
भारतीय वायू सैन्याकडून भंगारात हेलिकॉप्टर खरेदी केल्यानंतर मानसा येथील भंगार विक्रेता तीन हेलिकॉप्टर घेऊन मानसा येथे पोहोचला. आता तर ते हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. अख्खं शहर हेलिकॉप्टरच्या आत, वर, बाहेर उभं राहून फोटो काढत आहे.
4/ 5
नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून भंगार विक्रेतादेखील आनंदात आहे.
5/ 5
शहरात एकीकडे हेलिकॉप्टर मनोरंजनाचं साधन झालं आहे तर दुसरीकडे भंगार विकणाऱ्या कुटुंबासाठी हा व्यवहार फायद्याचा ठरला आहे. कारण यामुळे हॉटेल आणि पर्यटन ठिकाणी हे हेलिकॉप्टर उभे केल्यामुळे पर्यटकांसाठी हे आकर्षणाचं क्रेंद ठरू शकतं.