अमेरिकेच्या न्यूर्जी शहरातील ओल्ड ब्रीजजवळील एका जंगलात पास्ता आणि नूडल्सचा हा ढिग सापडला. थोडाथोडाका नव्हे तर तब्बल 200 किलोचा हा पास्ता.
2/ 5
एका महिलेने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली. तिने महापालिकेच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली आणि पालिकेने तात्काळ कारवाई केली.
3/ 5
इतकं फूड इथं आलं कुठून याचं रहस्य अखेर समोर आलं आहे. एका स्थानिकेने हे पास्ता-नूडल्स आपल्या शेजारच्या घरातील असल्याचं सांगितलं आहे.
4/ 5
या घरात राहणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आता तिचा मुलगा हे घर विकण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी तो घर रिकामं करतो आहे.
5/ 5
त्याच्या आईने हे पास्ता, नूडल्स कदाचित कोरोना लॉकडाऊनपासून हे जमवून ठेवलं होतं. ते शिजवलेले नव्हतं. पण पाऊस पडून ते ओले झाल्याने शिजल्यासारखे वाटू लागले.