आतापर्यंत तुम्ही चिकन, बकरा, डुक्कराचं मांस खाल्लं असेल पण कधी कुत्र्याचं मांस खाल्लं आहे का? आता तर हायकोर्टानेच याला परवानगी दिली आहे.
राज्य सरकारने कुत्र्याच्या मांसाच्या विक्रीवर तीन वर्षांपूर्वी बंदी घातली होती. 2020 साली कुत्र्यांची व्यावसायिक आयात, खरेदी आणि विक्री आणि कुत्र्याच्या मांसाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती. रेस्टॉरंटमध्ये ते देण्यावर बंदी होती.
4 जुलै 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने एक अधिसूचना आणत हा निर्णय लागू केला होता. पण या प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. बार आणि बेंच वेबसाइटच्या अहवालानुसार, गेल्या शुक्रवारी खंडपीठाने सरकारचा हा निर्णय रद्द केला.
नागालँड सरकारने ही बंदी घातली होती. ज्यावर गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय आहे. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)