

अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते जेव्हा कोणत्याही कौटुंबिक कार्यात, मग यंदा कर्तव्य आहे की काय? मुलगी/ मुलगा शोधला की नाही? असा प्रश्न विचारला जातो. मात्र कधी कोणी स्वत:शीच लग्न केल्याचं ऐकलं आहे. नसेलच, पण असं घडला आहे. ब्राझीलच्या डॉ. डिओगो रॅबेलोनं गर्लफ्रेंडनं ब्रेकअप केलं म्हणून स्वत:शी लग्न केला.


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये डिओगो यांचा साखरपूडा झाला होता. लग्नाची तारीखही ठरली होती. मात्र गर्लफ्रेंडनं लग्न करण्यास नकार दिला.


मात्र डिओगो लग्न करणाच्या निर्णयावर ठाम होता. म्हणून त्यानं 16 ऑक्टोबर रोजी स्वत:शीच विवाह केला.


डिओगोनं मित्र-परिवार यांच्या समक्ष स्वत: शी विवाह केला. यावेळी घरातली सर्व मंडळीही उपस्थित होती. लग्न झाल्यानंतर डिओगो भावूकही झाला होता.


डिओगोचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी त्यानं, "मी ज्या लोकांवर सर्वात जास्त प्रेम करतो, ते कुटुंब माझ्यासोबत आहे. यातच मी आनंदी आहे".


डिओगोनं असेही म्हटले आहे की, "लग्न हे इतरांसाठी करू नका. स्वत:चा आनंदही महत्त्वाचा आहे. मी उद्या दुसऱ्या कोणाशीही लग्न करेन, मात्र त्यात मी खूश नसेल तर त्याला अर्थ नाही".