एका व्यक्तीला त्याच्याच घरात एक रहस्यमयी घर सापडलं आहे. ज्याची त्याला माहिती नव्हती. हे घर मिळाल्यानंतर त्याला आनंद झाला पण जसा तो आत गेला तसा त्याला धक्काच बसला.
या व्यक्तीच्या घराच्या जागी एक दुकान होतं. नंतर तिथं चर्च बनवलं आणि शेवटी एका कुटुंबाला राहण्यासाठी घर बनवण्यात आलं. पण तिथं सिक्रेट घर असल्याची माहिती त्याला नव्हती.
जेव्हा त्याला हे घर सापडलं तेव्हा त्याने या संपूर्ण घटनेबाबत रेडीटवर माहिती दिली आहे. याचे फोटोही त्याने शेअर केले आहेत. पोस्टमध्ये त्याने म्हटलं मला एटिकच्या आत एक घर आहे. मला हे सापडलं तेव्हा मी खूप आनंदी झालो पण मला थोडं विचित्रही वाटलं.
या घरात भरपूर धूळ, कोळ्यांची जाळी आहेत. एक लिव्हिंग रूम, दोन बेडरूम, एक बाथरूम, टॉयलेट, सिंक आहे. घरात फर्निचर आणि काही खासगी सामानही आहे. न्यूजपेपरचे तुकडे आहेत जे एकत्रित करून त्यातील तारखेवरून इथं कोण-कधी राहत होतं ते समजेल, असं ही व्यक्ती म्हणाली.
दरम्यान घराचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला इथं भूतं घाबरवण्याआधी घर विकण्याचा सल्ला दिला आहे. पण त्याने आपण या घराचा राहण्यासाठीच उपयोग करणार असल्याचं सांगितलं.