मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे व्यक्तीने फसवणुकीची हद्द ओलांडली.
मुलीला आणि तिच्या कुटुंबाला अडकवण्यासाठी त्याने स्वतःला आरपीएफ जवान असल्याचं सांगितलं. त्याने स्वतःला अशा प्रकारे सादर केलं की मुलगी आणि तिचे कुटुंब त्याच्या जाळ्यात सापडतील.
मुलगी आणि कुटुंब जाळ्यात येताच त्यानं लग्न केलं. पण, हनीमूननंतर दोन दिवसांनी व्यक्तीचं गुपित उघड झालं आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.
रूप सिंह असं आरोपीचे नाव असून तो आठवी पास आहे. मुलीने पोलीसांत तक्रार करुन त्याला तुरुंगात पाठवले.