सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सिंहाजी गर्जना कानावर पडली तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
सिंह प्रामुख्याने दाक्षिण आफ्रिका आणि भारतातच आढळतात. भारतातही विशेषतः गुजरातच्या गीर जंगलात आणि काठियावाडच्या प्रदेशात.
सिंहाची भयावह गर्जना ही जगभर प्रसिद्ध असली तरी त्याची गर्जना किती दूर ऐकू येते याविषयी माहितीये का?
नॅशनल जिओग्राफिकनुसार, आफ्रिकन सिंहाची लांबी 10 फूट आणि वजन सुमारे 227 किलो आहे. जंगलाचा राजा असूनही सिंह फारसा चांगला शिकारी नाही. त्याच्या शिकारीचा सरासरी यश तीस टक्के आहे.
जन्माच्या एक वर्षानंतरच सिंह गर्जना करू लागतो. ते भरपूर मांस खातात. सिंह एका दिवसात 9 किलो मांस खातो.