बहुतेक लोक विमानात बसलेले असतील, परंतु प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की पायलटला विमानाचा रस्ता कसा कळतो?
विमान हवेत उडत असताना पायलट रस्ता कसा शोधणार? किती उंचावर जायचे हे कसं कळेल? आणि विमान कुठं उतरवायचं हे कसं समजणार? याविषयी जाणून घेऊया.
याशिवाय एअर ट्रॅफिक कंट्रोल देखील आहे, जे पायलटला कोणत्या दिशेला जावे आणि कोणत्या दिशेला जाऊ नये याची सूचना देत असते.
विमान साधारणपणे 35 हजार फूट उंचीवर म्हणजेच 10.668 किलोमीटरवर उडते. पण अनेक विमानेही ठिकाण आणि प्रवासानुसार त्यांची उंची बदलत राहतात.
केरोसीन आणि नॅफ्था केरोसीन यांचे मिश्रण विमानात इंधन म्हणून वापरले जाते. हे डिझेल इंधनासारखे आहे.