तुम्हाला बिअर प्यावीशी वाटली की आता दुकानात जाण्याची झंझटच नाही. कारण तुम्हीसुद्धा घरच्या घरी थंडगार बिअर बनवू शकता.
2 चमचे पावडर थंड पाण्यात मिसळली की दोन मिनिटांत बिअर तयार. जगातील ही अशी पहिली बिअर पावडर असल्याचा दावा केला जातो आहे.
या बिअरमुळे कार्बन उत्सर्जनही होणार नसणाऱ्या पर्यावरणासाठीही फायदेशीर. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही बिअर बाजारात येईल, असं सांगितलं जातं आहे.
जर्मनीत तयार करण्यात आलेली ही बिअर पावडर सध्या तिथेच उपलब्ध आहे. भारतासह इतर देशांमध्ये या बिअर पावडरसाठी प्रतीक्षा करावी लागेल. (सर्व फोटो प्रतीकात्मक/सौजन्य-Canva)