आपल्या घरी कुणीही पाहुणे आले की चहा-पाणी देऊन त्यांचं स्वागत होतं. पण भारतातील असं गाव जिथं पाहुण्यांचं स्वागत काठ्यांनी होतं.
आता काठ्यांनी स्वागत म्हणजे पाहुण्यांना काठ्यांचा मार दिला जातो असं नव्हे तर इथं तुम्हाला प्रत्येक जण घराच्या दारात काठी घेऊन बसलेला दिसेल. काठीशिवाय कुणी घराबाहेरही पडत नाही.
प्रत्येक जण काठी घेऊन फिरण्यास एक कारण आहे. ते म्हणजे या गावात असलेली कुत्र्यांची दहशत. माणूस घरातून बाहेर पडला की कुत्रा त्यांच्यावर हल्ला करतो. आतापर्यंत 40 पेक्षा अधिक लोकांचा कुत्र्यांनी बळी घेतला आहे. त्यामुळे येथील लोक भयभीत झाले आहेत.
कुत्र्याची दहशत इतकी आहे की लोक एकटे नाही तर गटानेच बाहेर पडता. आजपर्यंत त्या कुत्र्याला ग्रामस्थ पकडू शकले नाहीत.
आता हे गाव आहे कुठे तर बिहारच्या जमुई जिल्ह्यातील जोगाझिंगोई हे गाव. जिथं लोक हातात काठी घेऊन पाळत ठेवतात.