advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / PHOTO - एक विवाह ऐसा भी! थाटामाटात लागलं 2 झाडांचं लग्न; खास आहे कारण

PHOTO - एक विवाह ऐसा भी! थाटामाटात लागलं 2 झाडांचं लग्न; खास आहे कारण

दोन झाडांचा अनोखा लग्नसोहळा पार पडला.

01
मंगळ असलेल्या माणसाने झाडाशी लग्न केल्याचं तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे ते आता तुमच्यासाठी नवं नाही. पण आता दोन झाडांचंच लग्न लावण्यात आलं आहे.

02
आजवर तुम्ही माणसांप्रमाणे श्वानांची लग्नही पाहिलीत, आता तर झाडांचाही थाटामाटात लग्न झालं. पश्चिम बंगालमधील पूरबा बर्दमन जिल्ह्यात झाडांचा हा विवाहसोहळा पार पडला.

03
रेखादेवी नावाच्या महिलेने हे अनोखं लग्न लावलं आहे. रेखादेवी यांना दोन मुली आहेत, दोघींचीही लग्न झाली आहेत. त्यांनी या वटवृक्षाला आपल्या मुलाप्रमाणेच वाढवलं.

04
झाड मोठं झाल्यावर त्याचं लग्न लावायचं असं रेखादेवी आणि त्यांच्या पतीने ठरवलं होतं. पण त्याआधीच त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. पण रेखादेवी यांनी पतीसह पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्ष साकारलं.

05
रेखादेवींनी आपल्या व़डाच्या झाडाचं लग्न त्याच्या शेजारी असलेल्या रवीच्या झाडाशी लावून दिलं आहे. या लग्नासाठी त्यांनी लोकांकडून पैसे जमवले.

06
दोन्ही झाडांना साडी-धोतर नेसवून, नटवून थटवून अगदी पारंपरिक पद्धतीने थाटात लग्न लागलं. या लग्नाला अनेकांनी उपस्थिती लावत आशीर्वादही दिले.

  • FIRST PUBLISHED :
  • मंगळ असलेल्या माणसाने झाडाशी लग्न केल्याचं तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे ते आता तुमच्यासाठी नवं नाही. पण आता दोन झाडांचंच लग्न लावण्यात आलं आहे.

    MORE
    GALLERIES