घरात चिमुकला पाहुणा आल्यानंतर त्याचा आनंद सर्वांनाच होतो. अगदी सरकारच्या प्रेग्नंट महिला, नवजात बालक, लहान मुलांसाठी काही ना काही योजना आहेत. काही कंपन्याही प्रेग्नंट महिला आणि त्यांच्या बालकांना काही सुविधा देतात.
आता अशीच एक कंपनी चर्चेत आली आहे. जिने चक्क आपल्या कर्मचाऱ्यांना मूल झाल्यास त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
एका खासगी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ही जबरदस्त ऑफर दिली आहे. मुलांना जन्म द्या आणि 5 लाख रुपये घ्या, असं कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे. 1 जुलैपासून हा नियम लागू होणार आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष जेम्स लियांग म्हणाले, आम्ही जगभरातील आमच्या कर्मचार्यांना त्यांच्या प्रत्येक मुलासाठी 5 वर्षांसाठी दरवर्षी 10,000 युआन देऊ. हे पालकांच्या अनुदानाअंतर्गत असेल. कंपनी यासाठी 1 अब्ज युआन खर्च करणार आहे.
चीन-जपानसह अनेक देशांची लोकसंख्या म्हातारी होत आहे. एकही काम करणारे लोक शिल्लक नाहीत. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार लोकांवर अधिक मुले निर्माण करण्यासाठी दबाव आणत आहेत. विविध प्रकारच्या ऑफर्स देत आहेत.