जगभरात अनेक पाणीपुरीचे चाहते आहेत. जे कधी, कुठेही केव्हाही पाणीपुरी खाऊ शकतात. मात्र अशाही काही पाणीपुरी आहेत ज्या पाणीपुरी लव्हरही खाऊ शकत नाही.
नुकताच आंब्याचा सीझन झाला. यावेळी मॅंगो पाणीपुरी व्हायरल झाली होती. मात्र अनेकांनी ती विचित्र असल्याचं सांगितलं.
आईसक्रीम पाणीपुरी व्हायरल झाल्यावर लोकांनी यावर संताप व्यक्त केला होता. याध्ये आईस्क्रीमचं स्टफिंग केलं होतं.
पाणी पुरीच्या पुऱ्या चॉकलेट लेयरच्या बनल्याचाही व्हिडीओ समोर आला होता. ही चॉकलेट पाणीपुरीही इंटरनेटवर चांगली व्हायरल झाली होती.