हॉटेलमध्ये तुम्ही अनेकदा राहण्यासाठी जात असाल. यावेळी तुम्हीही हॉटेल रुममधील केटल वापरता का? वापरत असाल तर हे एकदा वाचाच. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण तेथील अनेक वस्तू वापरतो. मात्र याविषयीदेखील काळजी घेण्याजी गरज आहे. एका फ्लाइट अटेंडंटने सोशल मीडियावर हॉटेलमधील काही गलिच्छ गुपितचा खुलासा केला. एअरहोस्टेसने लिहिले की, अनेकवेळा ती या किटलीतच अंडरवियर धुते. या किटलीत बरेच लोक स्वतःची कॉफी बनवतात. महिलेच्या पोस्टनंतर यावर अनेक प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. एका व्यक्तीने लिहिले की तो कधीकधी या केटलमध्ये स्वतःसाठी चिकन शिजवतो. त्यामुळे त्या केटलचा कोण कशासाठी वापर करेल काही सांगू शकत नाही.