कोरोनामुळे दोन-तीन वर्षे लोकांचं जगणंच मुश्किल करून टाकलं होतं. आता कुठे कोरोना नियंत्रणात आला आणि मोकळा श्वास घ्यायला मिळतो आहे. (फोटो सौजन्य - Canva)
पण त्याचवेळी आता भविष्यात आणखी काय संकटं असतील असा प्रश्नही आपल्याला पडतो. सध्याची परिस्थिती पाहता भविष्यातील असचं एक संकट आता दिसू लागलं आहे. (फोटो सौजन्य - Canva)
डिजीटल आर्टिस्ट माधव कोहलीने आपल्या सोशल मीडियावर या संकटाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात लोक अशा रूपात दिसतील. (फोटो सौजन्य - ट्विटर/@mvdhav)
कोरोना काळात जसे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे मास्क दिसले. त्यापेक्षाही मोठे मास्क भविष्यात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतील. (फोटो सौजन्य - ट्विटर/@mvdhav)
घराबाहेर भाजी खरेदी करण्यासाठी तुम्हाला असं बाहेर पडावं लागेल. अगदी अंतराळवीरासारखं तुम्हाला तयार व्हावं लागेल. (फोटो सौजन्य - ट्विटर/@mvdhav)
फिट राहाण्यासाठी घराबाहेर पडत असाल तर त्यासाठी असा कॉस्ट्युम घालावा लागेल. अगदी स्विमिंग करताना घालतात तसा हा कॉस्ट्युम आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर/@mvdhav)
आता इतके फोटो पाहिल्यानंतर हे संकट नेमकं आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे संकट दुसरं तिसरं काही नाही तर दिल्लीतील वाढतं प्रदूषण आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर/@mvdhav)
दिल्लीतील वाढतं प्रदूषण पाहता भविष्यात प्रदूषणाने कोंडलेली दिल्ली कशी असेल हे या आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स फोटोच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. ज्यात दिवसा दिसणारी दिल्ली अशी असेल. (फोटो सौजन्य - ट्विटर/@mvdhav)