असंही एक ठिकाण आहे ज्याला पुरात बुडण्याचा शाप आहे. या शापापासून वाचण्यासाठी येथील राजघराण्यातील लोकांना आपले दागिने नदीत टाकावे लागतात.
पावसामुळे संपूर्ण पंजाबमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पटियालामध्ये घागर नदीचा कहर टाळण्यासाठी येथील खासदार आणि राजघराण्यातील राणी प्रनीत कौर यांनी आपली मुलगी जय इंदर सोबत जुनी परंपरा पाळली. त्यांनी नथ आणि चुडा नदीत सोडला.
राजघराण्यातील राणी प्रनीत कौर यांनी याआधी 1993 मध्ये पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत ही शाही परंपरा पार पाडली होती, जेव्हा शहरात पूर आला होता.
असं म्हटलं जातं की, एका फकीराने शाप दिला होता की पुरामुळे शहर नष्ट होईल, त्यानंतर जेव्हा जेव्हा पटियाला पूर आला तेव्हा राजघराण्याला त्याच्या क्रोधापासून वाचण्यासाठी वधूचे दागिने शहराच्या मोठ्या नदीत फेकून द्यावे लागले.