अनेकांना पावसात भिजायला आवडते. त्यात पावसाचे दिवस असल्याने देशभरातील अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. मध्यप्रदेशातही मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे लोकांना प्रचंड उकाड्यापासून आराम मिळतो आहे.
अशातच इंदूरच्या आल्हाददायक वातावरणात मुसळधार पावसात एका जोडप्याचा डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करून त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत.
इंदूरमध्ये सलग दोन दिवस अधूनमधून पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत इंदूरच्या भवर कुआन भागातील बीआरटीएस परिसराचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात रिमझिम पावसात जोडपे एकमेकांचे हात हातात घेऊन रोमँटिक डान्स करताना दिसत आहे.
या जोडप्याने रिमझिम पावसात रस्त्यावर केलेल्या या रोमँटिक डान्सबद्दल प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. सोशल मीडियावर असे बरेच लोक आहेत जे या जोडप्याने केलेल्या डान्सचे कौतुक करताना दिसले. तर या रोमँटिक डान्ससाठी अनेक लोक या कपलला ट्रोल करत आहेत. रस्त्याच्या मधोमध हा प्रकार करणं योग्य नाही, असेही काहीजण म्हणत आहेत.
पावसामुळे अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. तर दुसरीकडे, रिमझिम पावसात रस्त्यावर जोडप्याने केलेला हा डान्स इंदूरमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाले आहेत.