आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये स्त्रियांच्या इच्छांचं वर्णन एका श्लोकाद्वारे केलं आहे. स्त्रीणां द्विगुण आहारो लज्जा चापि चतुर्गुणा । साहसं षड्गुणं चैव कामश्चाष्टगुणः स्मृतः ॥
वरील श्लोकानुसार स्त्रियांची भूक पुरुषांपेक्षा दुप्पट असते. आजच्या जीवनशैलीत कामामुळे महिलांचा आहार बिघडला असला तरी त्या भुकेवर नियंत्रण ठेवतात.
आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीनुसार स्त्रियांना पुरुषांपेक्षा चौपट जास्त लाज असते. स्त्रियांमध्ये इतकी लाज वाटते की त्या काहीही बोलण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतात.
चाणक्य यांनी सांगितल्यानुसार महिला सुरुवातीपासूनच धैर्यवान असतात. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा सहापट अधिक धैर्य असतं. म्हणूनच स्त्रियांना शक्तीस्वरूप देखील मानलं गेलं आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा आठ पटीने जास्त कामवासना असते. पण लाजाळूपणा आणि सहनशीलता जास्त असते, ज्यामुळे त्या ते उघडपण बोलत नाहीत. आपल्या संस्कारांचे भान ठेवून त्या कुटुंबाला सन्मानाने सांभाळण्याचं काम करतात.
एकंदर काय तर चाणक्यनीतीनुसार महिलांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट भूक, चारपट लाज, सहापट धैर्य आणि आठपट कामवासना असते.