पाणीपुरी चाहत्यांसाठी एक खास मशिन लावण्यात आलं आहे. या मशिनने अनेकांना आकर्षित केलंय. ही मशीन लावण्यात आल्यानंतर, कोरोना काळात आता लोकांना पाणीपुरी खाण्याचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. (Photo: News18)
कोरोनापासून वाचण्यासाठी अमृतसरमध्ये एक असा पाणीपुरीवाला समोर आला आहे, जो स्पर्श केल्याशिवाय पाणीपुरी बनवतो. मशीनद्वारे ते पाणीपुरीसाठी लागणारं 6 प्रकारचं पाणी तयार करतो. (Photo: News18)
अमृतसरमधील शास्त्री मार्केटमध्ये पाणीपुरीची ही मशिन लावण्यात आली आहे. या मशिनमुळे ग्राहकांना पाणीपुरी बनवणाऱ्याच्या हातून पाणीपुरीचं पाणी टाकून घेण्याची गरज लागणार नाही. मशीनद्वारेच ग्राहक स्वत: हवं असलेलं 6 प्रकारचं पाणी टाकून घेऊ शकतात. (Photo: News18)
दुकान मालकाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात काम ठप्प झालं होतं. परंतु आता अनलॉकमध्ये पाणीपुरीचं मशीन लावल्यानंतर, पुन्हा एकदा ग्राहकांची मोठी गर्दी होत असून पंजाबमधील हे अशाप्रकारचं पहिलंच मशीन आहे. (Photo: News18)
मशीनमुळे कोरोनाची भीती काही प्रमाणात कमी वाटतेय. याठिकाणी पाणीपुरी खाणं सुरक्षित वाटतं. पाणीपुरीला दुकानदार हात लावत नाही, आम्ही स्वत:चं पुरीमध्ये मशीनद्वारे हवं ते पाणी घेतो, ही अतिशय चांगली बाब, असल्यास येथील ग्राहकांनी सांगितलं आहे. (Photo: News18)