नवरा-बायको म्हणजे दोन शरीर एक जीव असं नातं असतं. तन-मनाने ते एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे त्यांच्यात वेगळं असं काहीच नसतं. जे काही करायचं ते सोबत असंच असतं.
पण आचार्य चाणक्य यांच्यानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या महिला आणि पुरुषांनी एकत्र बिलकुल करू नयेत. चाणक्यनीतीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे.
पुरुष आणि महिलांनी एकत्र तपस्या करू नये. नाहीतर त्यांचं लक्ष विचलित होतं. जर तुम्हाला लक्ष्य गाठायचं असेल तर तपस्या वेगवेगळी करा.
दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र बसून अभ्यास करू नये. यामुळेही लक्ष विचलित होतं. नीट, लक्षपूर्वक अभ्यास करायचा असेल तर महिला-पुरुषांनी वेगवेगळाच करावा.
महिला-पुरुषांनी एकमेकांसमोर कधीच कपडे बदलू नयेत. पुरुषांनी अशा महिलेला कधीच पाहू नये, जी कपडे बदल असेल किंवा अंगावरील कपडे नीट करत असेल. (सर्व फोटो प्रतीकात्मक - Canva)