आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये मानवी आयुष्यासाठी अनेक सल्ले दिले आहेत. त्यापैकी हा एक सल्ला ज्यात त्यांनी महिला-पुरुषांनी कोणतं काम न लाजता करावं हे सांगितलं आहे.
धन कमावताना लाज बाळगू नका. चांगल्या, आरामदायी आणि सुथी आयुष्यासाठी धनाची आवश्यकता असते. आपल्या सर्व गरजा पैशांशी संबंधित आहेत.
अनेकांना उधार दिलेले पैसे किंवा सामान मागायलाही लाज वाटते. पण यासाठी बिलकुल लाजू नका. आपले पैसे, वस्तू वेळेत मागून घ्या.
आपलं आयुष्य चांगलं बनवण्यासाठी शिक्षणाची गरज असते. त्यामुळे गुरू किंवा शिक्षकांकडे शिक्षण घेताना बिलकुल लाजू नका.
अनेकदा असं होतं की सार्वजनिक ठिकाणी खायला अनेकांना लाज वाटते. पण आपण जे काही करतो ते भूकेसाठी, पोट भरण्यासाठी करतो. त्यामुळे भूक लागली की खावं, त्यात कोणतीही लाज बाळगू नका. (सर्व फोटो - प्रतीकात्मक - Canva)