हुंड्यात BMW कार न मिळाल्याने नवऱ्या मुलाने आपल्या नववधूला विमानतळावर सोडून पळ काढल्याची घटना घडली आहे. ही घटना हरियाणातील फरिदाबादमधील सेक्टर-9 ची आहे. मॅट्रिमोनिअल साइटवर या दोघांनी एकत्र येत डॉक्टर तरुणीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. हिस्सार येथील डॉक्टर दाम्पत्याने एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलासोबत नाते निश्चित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न जानेवारी महिन्यात गोव्यात झाले होते, मात्र हुंड्यात बीएमडब्ल्यू कार आणि रोख रकमेची मागणी करण्यात आली होती. परंतु ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे 27 जानेवारी रोजी वधूला गोवा विमानतळावर सोडून वराने पळ काढला. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध हुंडाबळी, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आणि इतर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हरियाणाच्या हिसारमध्ये राहणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचे स्वतःचे हॉस्पिटल आहे. त्यांचा मुलगा नेपाळ विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. अबीरचे आई-वडील आभा गुप्ता आणि अरविंद गुप्ता हिसारमध्ये स्वतःचे हॉस्पिटल चालवतात. अबीरच्या पालकांनी मॅट्रिमोनिअल साइटवर फरिदाबादच्या डॉक्टर मुलीचा बायोडेटा पाहिला आणि मुलीच्या पालकांशी त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल चर्चा केली. यानंतर 26 जानेवारी 2023 रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की, लग्नाआधी अबीरच्या पालकांनी 25 लाखांची मागणी केली याबाबत मुलीच्या वडिलांनी ही मागणी पूर्ण केली. यानंतर वराच्या घरच्यांनी मुलीच्या पालकांनी दिलेल्या खर्चाने गोव्यातील एका महागड्या हॉटेलमध्ये विवाह सोहळा पार केला. या फेऱ्यांनंतर अबीरच्या पालकांनी बीएमडब्ल्यू कारची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला. ती मागणी पूर्ण झाल्यावरच वधूला सोबत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर दुसरीकडे, अबीरने आपल्या झालेल्या पत्नीला गोवा विमानतळावर सुरक्षा तपासणीनंतर एकटीच बसवून तो पळून गेला. दरम्यान, अबीरची आईही त्या ठिकाणी बसलेल्या मुलीकडून दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावली आणि तीही पळून गेली. बराच वेळ झाल्याने अबीर परत न आल्याने मुलीने शोध घेतला. त्यानंतर बराच शोध घेतल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अबीर पळताना दिसला.
यावेळी मुलीच्या वडिलांनी हे प्रकरण मीडियासोबत शेअर करत, त्यांनी त्यांच्या मुलीचे नातेसंबंध आणि लग्नानंतर सुमारे 2 कोटी रुपये खर्च केले आहेत. गोवा पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने त्यांनी फरिदाबादच्या सेक्टर-8 पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे.