ऑस्ट्रियाच्या व्हिएनातील 26 वर्षांची मॉडेल वेरोनिका राजेकने अजब दावा केला आहे. डेली स्टारशी बोलताना तिने आपलं शरीर सोशल मीडियासाठी खतरनाक मानलं जात असल्याचं म्हटलं आहे. ती सांगते, काही लोक माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटलाही रिपोर्ट करतात कारण त्यांना माझ्या स्लिप लूकवर आक्षेप आहे. चांगलं दिसणंही अभिशाप असू शकतो. माझ्या नैसर्गिकरित्या असलेल्या शरीराचा ट्रोलर्स द्वेष करत असल्याचं ती सांगते. मी एक्स-रेडेट किंवा वादग्रस्त असं काही पोस्ट करत नाही. फक्त माझं शरीर दाखवते. तरी मला ट्रोल केलं जातं, असं ती म्हणाली. जर तुम्ही खूप सुंदर असाल तरी तुमचं शरीर समाजासाठी खतरनाक मानलं जातं, असं मत तिने व्यक्त केलं. माझ्या यशासाठी लोकांना मला शिक्षा द्यायची आहे, असंच मला वाटतं, असं ही मॉडेल म्हणते.