महाराष्टाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात. सध्या त्या त्यांच्या नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
पर्यावरण दिनाचं खास औचित्य साधत महाराष्टाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी काही फोटो शेअर केले आहेत.
अमृता फडणवीस यांनी निसर्गाच्या सानिध्यातील फोटो शेअर पर्यावरणावर प्रेम करा, पर्यावरणाचं रक्षण करा असा संदेश दिला आहे.
त्यांनी लिहिलं, काही लोक स्वतःला शोधण्यासाठी मानवनिर्मित जगात भटकतात. तर, काही जण स्वत:ला शोधण्यासाठी निसर्गात. पर्यावरणावर प्रेम करा, स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी त्याचे संरक्षण करा!