एका पेन्सिलची किंमत फार फार तर किती असेल, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, चला फार फार तर 100 रुपये. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल एक अशी पेन्सिल ज्याची किंमत तब्बल 80 लाख रुपये आहे. (फोटो- PA)
या आठव़ड्यात या पेन्सिलचा लिलाव होऊ शकतो. ज्याची बोली 80 लाखांपर्यंत लागू शकते, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. बेलफास्ट या ऑक्शन इन्स्टिट्यूटमार्फत याचा लिलाव होणार आहे. (फोटो - ट्विटर)
इंडिपेंडेंटला दिलेल्या मुलाखतीत ब्लूमफिल्ड ऑक्शनच्या मॅनेजिंग डायरेक्टरने सांगितलं की, ही पेन्सिल खूप खास आहे. यावर संबंधित व्यक्तीचं नाव आहे. फक्त नावच नाही तर त्याच्या पत्नीसोबतचं नातंही दाखवतं. (फोटो - ट्विटर)
इतिहासातील एक अशी व्यक्ती जिने या पेन्सिलने असे निर्णय लिहिले ज्यांनी इतिहासात मोठी छाप सोडली. या व्यक्तीने आपलं खासगी आयुष्य लोकांपासून लपवलं होतं. आता तुम्ही ही पेन्सिल कुणाची सांगू शकता का? (फोटो - ट्विटर)
ही पेन्सिल हुकूमशाह अडोल्फ हिटरलची आहे. त्याच्या पत्नीने त्याला ही गिफ्ट केली होती. त्यामुळे ती आणखी खास आहे. त्यामुळे ही हिटलरची असल्याचं समजताच खरेदीसाठी बरेच ग्राहक आहेत. (फोटो - ट्विटर)