प्रेग्नेंट असल्यावर महिला सहसा आराम करताना दिसून येतात. मात्र अशी एक महिला आहे जिने नवव्या महिन्यात आराम करण्याऐवजी चक्क पळण्याच्या शर्यतीत भाग घेतला. या महिलेचं नाव मॅकेना असून तिचं वय 30 वर्ष आहे. मॅकेनाने प्रेग्रेंट असताना 5km आणि 10km शर्यतीध्ये भाग घेतला आणि ती जिंकलीही. मॅकेनाने दुसऱ्या गरोदरपणात 5 मिनिटे 17 सेकंदात एक मैल पूर्ण करून तिचा पूर्वीचा विक्रम मोडला. गर्भवती महिलांसाठी धावणे शक्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तिने पाच मिनिटे आणि 25 सेकंदात एक मैल धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. तिने कमी वेळेत सरासरी एक मैल अंतर धावून कापलं आणि चॅम्पियन बनली.