आयरिस जोन्स नावाची ही महिला जी तिच्यापेक्षा 46 वर्षांनी लहान व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्यानंतर या जोडप्याचे फोटो जगभरात पाहिले गेले. त्यांच्या मुलाखती झाल्या. तेसुद्धा आपलं प्रेम खुलेपणाने सर्वांसमोर मांडू लागले, दाखवू लागले.
2019 मध्ये दोघांची पहिली भेट फेसबुकवर झाली होती. त्यानंतर वर्षभर डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. ती त्याच्यासाठी इजिप्तमधील कैरो येथे शिफ्ट झाली.
वयाचा माणसाच्या वैवाहिक जीवनाशी आणि आनंदाचा काहीही संबंध नसतो, असे ते सर्वांना सांगत. पण त्यांचं लग्न केवळ 2 वर्षे टिकू शकलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, आता आयरिस आणि तिचा पती मोहम्मद इब्राहिम वेगळे झाले आहेत.
आयरिस म्हणते, त्यांची रोमँटिक लाइफ चांगली होती पण त्यांच्यात भांडणं खूप होत होती. तिचा नवरा शेवटच्या दिवसात खूप चिडचिड करत होता. तिला शांतता हवी होती, म्हणून तिने त्याला सोडलं.
आयरिसने आपल्या 37 वर्षीय नवऱ्याच्या जागी दुसरी कुणी व्यक्ती नाही तर मांजराची निवड केली आहे. तिनं एक मांजर दत्तक घेतली, जिचं नाव ठेवलं मिस्टर टिब्स.
आता मांजरासोबत राहताना तिला नवऱ्याची आठवणही येत नाही. पतीऐवजी ती बहुतेक वेळ प्राण्याबरोबर घालवते. तो माणूस नसल्यामुळे काही अडचण येत नसल्याचं ती सांगते. (सर्व फोटो - Facebook/Iris Jones)