हे फोटो जालंधर येथील पोलीस डीएव्ही शाळेची आहेत. याठिकाणी एक नाही तर अनेक मुले-मुली शिकायला येतात. या शाळेत सुमारे 76 विद्यार्थी शिकण्यासाठी येतात, ते हुबेहुब एकमेकांसारखे आहेत, म्हणजे ते जुळे आहेत. तसेच तीन जोड्या अशा आहेत, ज्यांचे चेहरे एकसारखे आहेत आणि त्या सर्व बहिणी आहेत.
जेव्हा न्यूज 18 च्या टीमने पोलीस डीएव्ही शाळेला भेट दिली, तेव्हा तेथे अनेक विद्यार्थी होते ज्यांचे चेहरे एकमेकांसारखे होते. त्यांच्यापैकी काहींनी सांगितले की, जेव्हा आपण कोणतीही चूक करतो, तेव्हा कधी-कधी आमच्यासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा होते. यापैकी काहींनी तर शिक्षकांनी त्यांना कसे खडसावले आणि त्यांना कशी कठोर शिक्षा झाली याचे किस्सेही सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी विज म्हणाल्या की, जेव्हा त्यांना समजले की त्यांच्या शाळेतील सत्तरहून अधिक मुलांचे चेहरे एकमेकांशी जुळतात, तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटले. नंतर त्यांनी आपल्या शाळेचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले, असेही त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, त्यांच्या शिक्षकांनीही त्यांना अनेकदा सांगितले होते की, ते काही मुलांना ओरडायचे. पण जेव्हा त्यांना कळले की त्यांनी ज्या मुलाला ओरडले आहे, तो हा नाही तर त्याचे जुळा आहे, तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं.