पुरुषापासून घटस्फोट घेणं हे प्रत्येक महिलेसाठी खूप वेदनादायी असतं. त्यामुळे जपानमध्ये घटस्फोटित महिलांसाठी एक मंदिर बांधण्यात आलं आहे. याच्याविषयी खास गोष्टी जाणून घेऊया.
जपानमध्ये 600 वर्षांपूर्वी महिलांच्या सक्षमीकरण्यासाठी एक मंदिर बांधण्यात आलं होत जे आता घटस्फोट मंदिर म्हणून ओळखलं जातं.
जर एखादी महिला तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी नसेल आणि घरगुती हिंसाचाराला बळी पडली असेल तर ती या मंदिरात येऊन राहायची.
काही काळानंतर या मंदिराने अधिकृतपणे महिलांना घटस्फोटाचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्या त्यांचे जीवन आनंदाने जगू शकतील.
प्रमाणपत्रासह, महिलांना कायदेशीररित्या विवाहाचे स्वातंत्र्य दिले गेले. महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून हे मंदिर ओळखले जाते.
जपानमध्ये महिलांना अधिकार नसताना हे मंदिर बांधण्यात आले होते. घरात अत्याचार झालेल्या महिलांना या मंदिरात आधार मिळत असे.