ही संपूर्ण घटना बाबा चांदपुरी श्री श्री 1008 महाराजांच्या डेऱ्यातील आहे. इथे हा लहान मुलगा सकाळी उठायचा आणि गावात भिक्षा मागायचा. हा छोटा साधू सोमवार गिरी महाराजांसोबत राहायचा. सोमवार गिरी महाराज यांचे म्हणणे आहे की, साधूंनी मुलाचे नावही ठेवले होते.
आता या मुलाचे नाव शंकर गिरी असे ठेवण्यात आले आहे. तर त्याचे पहिले नाव अमीर असे होते. हा मुलगा साडेपाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला कनोह गावात असलेल्या साधूंच्या डेऱ्यात दान केले होते. तेव्हापासून तो त्यांच्यासोबत राहत होता.
यानंतर सोमवार गिरी महाराज जिथे जिथे जातात तिथे हे बाळ त्यांच्या सोबत असतो. दरम्यान, या मुलाला बालसुधार गृहातील अधिकाऱ्याने विचारले, तुला आई-वडिलांकडे जायचे आहे का, तर त्याने हो असे उत्तर दिले. तसेच याठिकाणी त्याचे मन लागते का, तर त्याने नाही असे उत्तर दिले.
यासोबत या मुलाला येथे कसे आणले असे विचारले असता, गुरूंनी त्याला इथे आणले, असे त्याने सांगितले. तर पोलीस ठाण्याचे प्रभारी कृष्ण कुमार यांनी सांगितले की, त्यांना याबाबतची माहिती मिळाली होती.
सिसाए गावात एक 6 वर्षांचा मुलगा साधू बनून राहत आहे. याठिकाणी पोलिसांनी धाव घेतला असता, हा मुलगा इथे नव्हता. यानंतर या मुलाला साधू बनवण्यात आल्याबाबत कागदपत्रे मागण्यात आली तर काहीही देण्यात आले नाही. त्यामुळे अशाप्रकारे मुलाला ठेवणे हे बेकायदेशीर आहे.
त्यांनी सांगितले की, बालसुधार गृहातील अधिकारी प्रदीप यांनी मुलाकडून माहिती घेतली आहे. यानंतर मुलाला आपल्या सोबत घेण्यात आले. तसेच मुलाची वैद्यकीय चाचणी केल्यावर त्याला सीडब्ल्यूसीच्या ताब्यात देण्यात येईल.
याबाबत मुलाच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. असे करणे, बाल न्याय कायदा आणि बाल कायदा याशिवाय भारतीय दंड संहितेअंतर्गतही हा गुन्हा आहे.