जगात अनेक निरनिराळी ठिकाणं आहेत ज्याची वेगळी मान्यता आहे. काही गुप्त ठिकाणही आहेत जिथे आपण जाऊ शकत नाही. अशात काही गुप्त ठिकाणांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत जिथे जाण्यास बंदी आहे.
उत्तर कोरियामध्ये प्रवेश करणे अत्यंत कठीण आहे. या रहस्यमयी देशात एक जागा आहे, जी अत्यंत गुप्त आहे. या ठिकाणी बेकायदेशीर कामे केली जात असल्याचे सांगितले जाते. यासोबतच येथे औषधे बनवली जातात. या ठिकाणी सर्वसामान्यांना येण्यास बंदी आहे.
रशियाच्या सुंदर शहरांमध्ये समाविष्ट असलेलं मेझगोर ठिकाण बंद आहे. असे म्हणतात की येथे राहणारे लोक कोणत्या ना कोणत्या मिशनवर काम करतात. यासोबतच अनेक गुप्तहेरांची कामे येथे चालतात, पण कार्यक्रम काय आहे याची माहिती मिळत नाही. या ठिकाणी लोकांना जाण्यास बंदी आहे.
स्नेक आयलंड हे बेट ब्राझीलमध्ये आहे, जिथे जगात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. हा परिसर 110 एकरमध्ये पसरलेला असून, येथे चार हजार सापांचे वास्तव्य आहे. येथे सामान्य साप राहत नाहीत. इथे जाण्यास सर्वसामान्यांना बंदी आहे.
नॉर्थ सेंटिनेल बेट भारतातील हे ठिकाण आजही जगासाठी एक रहस्य आहे. जगातील धोकादायक ठिकाणांमध्ये याचा समावेश होतो. अंदमानमध्ये असलेल्या या ठिकाणी राहणारे आदिवासी येथे कोणालाही जाऊ देत नाहीत.
एरिया-51 अमेरिकेत या ठिकाणी कोणालाही जाण्याची परवानगी नाही. हे ठिकाण लॉस वेगसपासून 83 किमी अंतरावर आहे. अमेरिकन सरकार या ठिकाणी एलियन्स आणि यूएफओशी संबंधित प्रयोग करत असल्याचे सांगितले जाते. वाद आणि रहस्यांनी भरलेल्या या ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश बंदी आहे.