तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी प्रतिसादात 'उणिवा' असल्याचे मान्य केले. पण, आपत्ती 'नियती' असल्याचे देखील म्हटलं आहे. इमारतींच्या निकृष्ट बांधकामावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. उच्च मृत्यू दरासाठी निकृष्ट बांधकाम कारणीभूत असल्याचे अनेकांचे मत आहे. तुर्कीचे माजी मुत्सद्दी इमदत ओनर म्हणाले की त्यांचा विश्वास आहे की सोशल मीडियाद्वारे पसरलेल्या व्हिडिओने विशेषतः लोकांच्या संतापाला हातभार लावला.
ट्विटरवर 13 लाख व्ह्यूज असलेल्या एका व्हिडिओमध्ये तुर्कीचे परिवहन मंत्री आणि एर्दोगानच्या पक्षातील आणखी एक अधिकारी भूकंपामुळे सर्वात गंभीरपणे प्रभावित झालेल्या अद्यामनमधून पळून जात असल्याचे दाखवले आहे. तेव्हा संतप्त जमावाने त्यांच्यावर आरडाओरडा सुरू केला. लोकांनी अधिकाऱ्यांच्या गाडीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.