अजूनही तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. शक्तिशाली भूकंपानंतर आतापर्यंत 100 हून अधिक आफ्टरशॉक बसले आहेत. इथल्या भयंकर विध्वंसाने लोक भयभीत झाले आहेत. फोटो पाहून हा विध्वंस किती मोठा होता याची तुम्ही कल्पना करू शकता. (फोटो: Anadolu Agency/ AFP)
हा फोटो इदलिब प्रांतातील तुर्की सीमेजवळील हेरम शहराचा आहे, जिथे शोधकर्ते ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. (Ghaith Alsayed/AP Photo)
विवादित तुर्की-सीरियन प्रांत हातेमध्ये आपत्कालीन कर्मचारी ढिगाऱ्यातून वाचलेल्यांचा शोध घेत आहेत. जखमींच्या श्वासोच्छवासाच्या आवाजावरून ते कुठे दबले आहेत का? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. (फोटो: Erdem Şahin/EPA)
तुर्कस्तानमधील हाते येथे कोसळलेल्या इमारतींचे हवाई दृश्य. यात संकट किती मोठं आहे, याची कल्पना येते. सर्व घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
सीरियाच्या अलेप्पो जिल्ह्याचे हवाई दृश्य स्पष्टपणे दर्शवते की असे कोणतंही घर नाही, ज्याचे नुकसान झाले नाही. (फोटो: Anadolu Agency)
सोमवारी पहाटेच्या आधी झालेल्या भूकंप आणि आफ्टरशॉकमधील मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कारण बचावकर्त्यांनी मंगळवारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध सुरू ठेवला आहे. देशात शोककळा पसरली आहे. (फोटो: Ilyas Akengin/AFP)
हा फोटो अस्वस्थ करणारा आहे. हा सीरियातील आफ्रीन येथील एका रुग्णालयाचा आहे, ज्यामध्ये पिशव्यात भरलेले मृतदेह जमिनीवर पडलेले आहेत. (फोटो: Mahmoud Hassano/Reuters)
तुर्कस्तानच्या आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतर देशाच्या मध्य आणि दक्षिण भागात सर्वोच्च पातळीवरील आणीबाणी घोषित केली आहे. (फोटो: Ghaith Alsayed/AP Photo)