जुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानात माजी पंतप्रधानांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. जुल्फिकार अली भुट्टो असं त्यांचं नाव होतं. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे वडील होते. 14 ऑगस्ट 1973 ते 5 जुलै 1977 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्याच्या हत्येचा आरोप होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे आरोप फेटाळल्यानंतर अवघ्या आठ तासांत फाशी देण्यात आली.
नवाज शरीफ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. भ्रष्टाचाराचे प्रकरण चर्चेत येताच नवाझ शरीफ देश सोडून ब्रिटनला गेले. पण ब्रिटनमधून परतताच त्याला आणि त्याच्या मुलीला अटक करण्यात आली. शरीफ 3 वेळा पाकिस्तानचे झाले मात्र त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.