

मैत्रीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण मानव आणि पक्ष्याची मैत्री तुम्ही ऐकली आहे का? रेसेप मिर्झान आणि त्यांचा मित्र असणाऱ्या हंसाची कहाणी देखील अशीच अविस्मरणीय आहे. (फोटो सौ. AP news)


थोडीथोडकी नाही तर या दोघांची मैत्री 37 वर्ष जुनी आहे. तुर्कस्तानमध्ये राहणाऱ्या रेसेप आणि त्यांच्या हंसाची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. पश्चिम एडिरने भागात 37 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त असणाऱ्या पोस्टमन रेसेप मिर्झान यांना हा हंस सापडला होता. (फोटो सौ. AP news)


एकेठिकाणी जात असताना मिर्झान आणि त्यांच्या मित्रांच्या नजरेसमोर हा हंस दिसला. त्याचे पंख तुटलेले होते आणि तो एका मैदानात पडला होता. मिर्झान यांनी त्याला शिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी स्वत:च्या कारमध्ये ठेवले. त्यानंतर ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून हा हंस त्यांच्याबरोबर ग्रीस सीमेजवळ असणाऱ्या त्यांच्या घरात आणि शेतात वावरतो. (फोटो सौ. AP news)


त्यांच्यामध्ये इतकी चांगली मैत्री आहे की संध्याकाळी दररोज ते फेरफटका मारण्यासाठी जातात. मिर्झान यांचे प्राणीपक्ष्यांवर विशेष प्रेम आहे. जेव्हा या मुक्या जनावरास मी जखमी अवस्थेत पाहिले तेव्हा त्याला तसेच सोडण्यापेक्षा घरी घेऊन येणे योग्य वाटले, असं मिर्झान सांगतात. ते म्हणतात की आम्हाला एकमेकांबरोबर खूप चांगलं वाटतं. आमची मैत्री दृढ आहे, कधी आम्ही एकमेकांपासून वेगळे होणार नाही. मिर्झान यांनी त्याचे नाव गॅरिप असे ठेवले आहे. (फोटो सौ. AP news)