खोल दरीत लटकण्याचा आनंद घेण्यासाठी या हॉटेलला जातात लोकं, पाहा थरकाप उडवणारे PHOTO
हवेत लटकणाऱ्या या 'कासा एन एल आइरे' (Casa en el Aire) या हॉटेलची खास बाब म्हणजे, पर्यटकांना हवेत झोपाळ्यासारख्या अनेक चादरी तारेवर लटकवण्यात आल्या आहेत. ज्यावर झोपून पर्यटक समोरील सुंदर निसर्गाचा आनंद घेऊ शकतात.


कोलंबियातील एका गिर्यारोहकाने दरीत लटकणारं एक हॉटेल, लॉज तयार केलं आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)


Casa en el Aire असं या हॉटेलचं नाव आहे. ज्याचा स्पॅनिश भाषेत शब्दश: हवेतील घर असा अर्थ होतो. कोलंबियन पर्वतावर हे हॉटेल बांधण्यात आलं आहे. जमीनीपासून जवळपास 30 मीटर उंचीवर हे हॉटेल हवेत लटकत राहतं. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)


हवेत लटकणाऱ्या या हॉटेलची विशेष बाब म्हणजे, याच्या आणखी वर, काही अंतरावर पर्यटकांना हवेत झोपाळ्यासारखी चादर तारेच्या साहाय्याने बांधण्यात आली आहे. ज्यावर बसून, झोपून पर्यटक समोरील निसर्गाचा सुंदर नजारा पाहू शकतात. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)


या झोपाळ्यापासून 20 मीटर खाली जमीन आहे. तर, समुद्रसपाटीपासून या जागेची उंची जवळपास 2500 मीटर आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)


या लाकडी हॉटेलवर पत्र्याचं छप्पर आहे. सेरो सान विसेंटे नावाच्या एका ऐतिहासिक दगडाला ते जोडलेले आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)


या हॉटेलमधून कॉफीची शेती असणारं, कोलंबियातील एंटीओक्विया भागातील अबेजोराल या गावातील सुंदर दृष्य दिसतं. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)


कोलंबियन गिर्यारोहक नील्टोन लोपेज यांनी हे दरीतलं हॉटेल बांधलं आहे. रशिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी, हे असामान्य हॉटेल बांधणं म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगितलं. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)


या हॉटेलमध्ये येण्यासाठी तारांचा एक पूल बांधण्यात आला आहे. (फोटो क्रेडिट- Casa En El Aire, Instagram)