Home » photogallery » videsh » BRIDGER WALKER 6 YEAR OLD BOY SAVED SISTER FROM DOG GOT BITTEN CAPTAIN AMERICA STAR CHRIS EVANS SALUTE HIM MHPG
खरा Iron Man! 6 वर्षांच्या भावाने बहिणीला कुत्र्यापासून वाचवले, चेहऱ्यावर पडले 90 टाके
6 वर्षांच्या मुलाने बहिणीचा जीव वाचवला खरा मात्र त्याच्या चेहऱ्याची अशी झाली अवस्था
|
1/ 6
सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ब्रिजर वॉकर नावाच्या 6 वर्षांच्या मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. याचे कारण वाचून तुम्ही या मुलाला सल्यूट कराल.
2/ 6
अमेरिकेच्या व्योमिंग येथे राहणाऱ्या ब्रिजरनं आपल्या 4 वर्षाच्या बहिणीचा जीव वाचवला. मात्र यात त्याला चेहऱ्यावरती 90 टाके पडले.
3/ 6
ब्रिजर वॉकरची कहाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या 6 वर्षांच्या ब्रिजरला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनचे विजेतेपदही देण्यात आले आहे. वॉकरच्या शौर्याची बातमी वर्ल्ड बॉक्सिंग कौन्सिलपर्यंत पोहोचताच त्यांनी ब्रिजरच्या या शौर्यास ही उपाधी दिली.
4/ 6
कुत्र्याने केलेल्या हल्ल्यानंतर वॉकरला स्वत: ला गंभीर दुखापत झाली. 2 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर आणि 90 टाकेनंतर मुलावर उपचार करण्यात आले. जेव्हा ब्रिजरला विचारले की, तु पळून का गेला नाहीस, त्यावर त्याने कोणाला तरी मरायचे होते, मग मी का नाही.
5/ 6
ब्रिजरच्या शौर्याची कहाणी त्याची काकीमुळे लोकांपर्यंत पोहचली. निकोल वॉकरनं सोशल मीडियावर ब्रिजर आणि त्याच्या बहिणीचे फोटो पोस्ट करत याबाबत सांगितले.
6/ 6
जगभरातून ब्रिजरला हिरोनं संबोधले जात आहे. हॉलिवूड फिल्म स्टार क्रिस इवान्स जो कॅप्टन अमेरिकामुळे प्रसिद्ध आहे, त्याने ब्रिजरची संवाद साधत त्याचे कौतुक केले.