जगभर कोरोना (Coronavirus)ची प्रचंड भिती निर्माण झाली आहे. अफवा पसरत आहेत. याचं अफवेने श्रीलंकेत 8 जणांचा बळी घेतला. राजधानी कोलंबो जवळ असणाऱ्या जेलमध्ये ही अफवा पसरली होती. त्यामुळे कैद्यांमध्ये उद्रेक झाला. त्या भितीने कैदी जेलमधून पळण्याचा प्रयत्न करत होते त्याच वेळी ही दंगल भडकली. (फोटो- AFP) या घटनेत 8 कैद्यांचा मृत्यू झाला तर 55 जण जखमी झालेत अशी माहिती पोलिसांचे प्रवक्ते अजित रोहाना यांनी दिलीय. कोलंबोपासून हे महारा कारागृह 15 किलोमीटर दूर आहे. श्रीलंकेतल्या अनेक कारागृहांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कैद्यांनी आंदोलनही पुकारलं आहे. (फोटो- AFP) काही कैद्यांनी कारागृहाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना त्यापासून रोखलं यानंतर ही दंगल भडकली. जखमी कैद्यांना रगामा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. (फोटो- AFP) जेलमधल्या कैद्यांनी स्वयंपाक घरं आणि रेकॉर्ड रूमला आग लावली. त्यामुळे धूर निघू लागला. कारागृहाच्या प्रमुखांनाही ओलीस ठेवण्याचा प्रयत्न कैद्यांनी केल्याची माहिती दिली जात आहे. (फोटो- AFP) या महारा कारागृहात आत्तापर्यंत 175 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तर कारागृहाचे संबंधित सर्व मिळून 1 हजार लोक बाधित झाले आहेत. या आधीची कैद्यांचा उद्रेक झाला होता. त्यात एक जणाचा मृत्यू झाला होता. (फोटो- AFP) श्रीलंकेतल्या कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असून 10 हजार क्षमता असलेल्या जेलमध्ये तब्बल 26 हजार कैदी आहेत. श्रीलंकेत 22,988 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 109 जणांचा बळी गेला आहे. (फोटो- AFP)