अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेत त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला डावललं आहे. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना काळातील ढासळलेली अर्थव्यवस्था आणि बेरोजगारी यांच्यावर मात करण्यासाठी एक निर्णय घेत 2020 संपेपर्यंत ग्रीन कार्ड देण्यावर सक्त मनाई केली होती. डिसेंबरमध्ये ही बंदी वाढवत त्यांनी मार्च अखेरपर्यंत केली होती. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)
याबद्दल मत व्यक्त करताना बायडन यांनी म्हंटल आहे की, या निर्णयामुळे अमेरिकेचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे. या नियमांतर्गत येथील स्थायिक असलेल्या कुटुंबांना भेटण्यावरसुद्धा बंदी आहे. आणि ही गोष्ट व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत वाईट आहे. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)
अमेरिकेच्या स्थलांतरण वकील संघटनेच्या मते, त्या निर्णयामुळे स्थलांतरण व्हिसा वर मोठ्या प्रमाणात बंदी आली होती. आता बायडन यांनी हा निर्णय फिरवून ग्रीन कार्ड पुन्हा सुरू करणार असल्याचं जाहीर केलं. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)