आपण फॉरेन ट्रिपवर जावं असं अनेकांना वाटतं. पण त्यासाठी खर्चही खूप होतो. काही लोकांच्या खिशाला परवडणारं नाही म्हणून ते परदेशात जाणं टाळतात. तर काही लोक यासाठी पैसे जमवतात. (प्रतीकात्मक फोटो)
पण तुम्हाला आश्चर्य वाटेल आता फॉरेन ट्रिपवर जाण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये जमवण्याची गरजत नाही. फक्त 5 हजारांत तुम्ही फॉरेनला जाऊ शकता. तेसुद्धा फक्त एक नाही तर तीन-तीन देश फिरू शकता. (प्रतीकात्मक फोटो)
एका ट्रॅव्हलर महिलेने कमीत कमी पैशांत परदेशात कसं फिरायचं याची ट्रिक सोशल मीडियावर शेअर केली आहे. सबीना ट्रोजोनोवा असं या महिलेचं नावा आहे. 29 वर्षांच्या सबीनाने 5 हजारांत तिने 3 देश फिरण्याचा सोपा फंडा सांगितला आहे. (प्रतीकात्मक फोटो)
तिने आयरिश कॅपिटलमध्ये दोन दिवस घालवले इथं तिनं मार्सेल्लेसाठी तिकीट बुक केली. ज्याची किंमत 1800 रुपये होती. तिथं एक दिवस घालवला.त्यानंतर तिने स्पेनसाठी तिकीट बुक केलं, जी फक्त 1700 रुपये होती. (सबीना ट्रोजोनोवा/ फोटो सौजन्य - SWNS)
प्रत्येक ठिकाणी राहण्या आणि खाण्यापिण्यावर तिने कमीत कमी पैसे खर्च केले. ट्रिपवरून परतल्यावर तिने हिशेब केला. तेव्हा 6 दिवसांच्या ट्रिपमध्ये 63 हजार रुपये खर्च झाले. तिच्या प्रवासात विमानाची तिकीट पाच हजारपेक्षाही कमी होती. (सबीना ट्रोजोनोवा/ फोटो सौजन्य - SWNS)