बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वे वंदे भारत एक्स्प्रेस अखेर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून धावणार आहे
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, साईबाबांचं शिर्डी, पंढरपूर तसंच सिद्धेश्वर मंदिर सोलापूर या धार्मिक स्थळांना जोडण्याचं काम या दोन्ही वंदे भारत रेल्वेनं होणार आहे.
सीएसएमटी-साई नगर शिर्डी हे अंतर वंदे भारत रेल्वे 5 तास ५५ मिनिटांमध्ये पूर्ण करणार असून आठवड्यातील सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे.
जीपीएस आधारित ऑडिओ व्हिडीओ प्रणाली, स्वयंचलित खिडक्या दरवाजे, अत्याधुनिक सीसीटीव्ही या सर्व सोयी या रेल्वेत आहेत.
या टेनच्या सुपरफास्ट स्पीडमुळे हजारो प्रवाशांचा प्रवासामधील वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर मुंबई-सोलापूर आणि मुंबई-नाशिक-शिर्डी ही शहरं आणखी जवळ येणार आहेत.