बेटवा नदीच्या काठावर वसलेले ओरछा हे सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण कोरलेली मंदिरे आणि भव्य राजमहालांसाठी प्रसिद्ध आहे. बुंदेल राजपूत प्रमुखाने 1501 मध्ये बुंदेलांची राजधानी म्हणून याची स्थापना केली होती. इथे गेल्यास राजा राम मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, जहांगीर महल अशी सुंदर ठिकाणे पाहायलाच हवीत. या शहराला राजवाड्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. Image : Canva
हे विस्तीर्ण पांढरे वाळवंट भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणता येईल, जेथे हिवाळ्यात (डिसेंबर-फेब्रुवारी) रण उत्सव हे मुख्य आकर्षण असते. यावेळी वाळवंटात कॅम्पिंग आयोजित केले जाते आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. Image : Canva
निसर्गप्रेमींसाठी दक्षिण भारतातील मुन्नार हे शहर एखाद्या रत्नासारखे आहे. असे म्हणतात की, केरळ ट्रिपदरम्यान तुम्ही मुन्नारला गेला नाही, तर कुठेच गेला नाही. चहाच्या बागा, विदेशी वनस्पती आणि प्राणी, धुके असलेला परिसर आणि धबधबे हे ठिकाण विस्मयकारक बनवतात. हिवाळ्यात हे ठिकाण आणखीनच सुंदर दिसते. Image : Canva
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समावेश असलेले हंपी हे कर्नाटक राज्यातील दऱ्या आणि टेकड्यांमध्ये वसलेले अवशेषांचे शहर आहे. इतिहासप्रेमींसाठी आणि गर्दीपासून दूर राहायला आवडणाऱ्यांसाठी हे एक खास ठिकाण आहे. विजयनगर साम्राज्याचे सुमारे 500 प्राचीन स्मारके, सुंदर मंदिरे आणि नयनरम्य अवशेष येथे पाहायला आहेत. Image : Canva
हिवाळ्यात, नागालँडमध्ये प्रसिद्ध हॉर्नबिल उत्सव साजरा केला जातो, जो 10 दिवसांचा उत्सव आहे. हा उत्सव आदिवासी लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी आणि आंतरसांस्कृतिक सौहार्द वाढवण्यासाठी केला जातो. याशिवाय, हा सीझन पाहुण्यांसाठी योग्य मानला जातो, ज्यामध्ये ते येथील दऱ्या आणि संस्कृती अधिक चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करू शकतात. येथे एक संस्मरणीय अनुभव तुम्ही घेऊ शकतात. Image : Canva